Ranjangav Shri Mahaganapati रांजणगावचा श्री महागणपती श्रीमहागणपती – रांजणगाव
यः श्रीशंभुवरप्रदः सुतपसा नाम्ना सहस्त्र स्वकम ।
दत्त्वा श्रीर्विजय पदं शिवकरं तस्मै प्रसन्नः प्रभू ।।
तेन स्थापित एव सद्गुणवपुः क्षेत्रे सदा तिष्ठती।
तं वंदे मणिपूरके गणपती देवं महान्त मुद्रा ।।
अर्थ : शिवशंकराने श्रीगणेशाकडून विजेतेपदाचा वर मिळवला. ज्याने शंकरास वर दिला, ज्याचे रूप अत्यंत प्रसन्न आहे, जो साक्षात सद्गुणमूर्ती आहे, जो मणिपूर क्षेत्री (रांजणगावी) वास करतो अशा महान दैवताला मी आनंदाने वंदन करतो आहे.
महागणपती म्हणजे शक्तियुक्त गणपती. या महागणपतीला ( Ranjangav Shri Mahaganapati रांजणगावचा श्री महागणपती )आठ, दहा किंवा बारा हात असतात ह्या महागणपतीचे ध्यान करून भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुर या रक्षसावर विजय मिळवला. म्हणूनच याला ” त्रिपुरारिवरद महागणपती ” असे देखील म्हटले जाते .
श्रीक्षेत्र रांजणगावचे भौगोलिक स्थान व मार्ग :-
श्रीक्षेत्र रांजणगावच्या नावात जरी गाव असले तरी पुणे – नगर मार्गावर असल्यामुळे रांजणगाव बऱ्यापैकी विकसित शहरच आहे. पुणे- नगर रोडवरून जाणाऱ्या एस.टी. च्या सर्वच गाड्या (जलद, अतिजलद सुद्धा) रांजणगाव गणपतीला थांबतात.
१) तसेच पुणे – नगर महामार्गावर पुणे , कोरेगाव , शिक्रापूरमार्गे रांजणगाव हे श्रीक्षेत्र शिरूरच्या आधी २१ कि.मी. अंतरावर पुण्यापासून ५० कि.मी. दूर आशा अंतरावर रस्त्याला लागूनच आहे.
२) पुण्याच्या शिवाजीनगर येथील बस स्थानकाहून सतत एस.टी. बसेस सुटतात. पावसाळयातही प्रवासास रस्ता चांगला आहे.
(Ranjangav Shri Mahaganapati रांजणगावचा श्री महागणपती )महागणपतीची पौराणिक कथा :
फार प्राचीन काळी त्रेतायुगात गृत्समद नावाचा एक थोर ज्ञानी ऋषी होऊन गेला. गणांना त्वाम गणपती ह्या मंत्राच्या जपाच्या आधी गृत्समद ऋषीचे नाव घेतले जाऊ लागले.
एके दिवशी गृत्समद ऋषींना मोठी शिंक आली आणि त्यांच्या शिंकेतून एक जास्वंदीच्या फुलासारखा लाल रंगाचा मुलगा बाहेर पडला. गृत्समदऋषींनी या मुलास आपला पुत्र मानले. “मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादाक्रांत करून, इंद्रासही जिंकेन असा तो मुलगा गृत्समदऋषींना म्हणाला. तेव्हा गृत्समद ऋषींना त्यास ” गणांना त्वाम ” या गणेशमंत्राचा उपदेश केला. पित्याने दिलेल्या मंत्रानुसार बालकाने पाच हजार वर्षे खडतर तपश्चर्या केली आशा त्याच्या खडतर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणेशाने त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला.
तसेच गजाननाने त्याला पुढील तीन नगरे दिली -लोखंड , रूपे आणि सुवर्णा . आणि सांगितले “तुझ्याकडे असलेल्या या तीन पुरांमुळेच तुला त्रिपुर हे नाव मिळेल . भगवान शंकराशिवाय तुझा पराभव कोणीही करणार नाही. तु या लोकी अनेक सुखे उपभोगल्यावर शिवशंकर एकाच बाणाने तुझ्या या त्रिपुरांचा नाश करेल व तुलाही मुक्ती मिळेल.” असा वर गणेशाने दिला.
गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला. त्याने अवघ्या त्रैलोक्यात त्राही भगवान करून सोडले. त्याने प्रथम मृत्युलोक पादाक्रांत केला. नंतर इंद्राचा पराभव करून स्वर्गाचे राज्य घेतले. त्रिपुरासुराच्या भयाने ब्रह्मदेव कमळात लपला व विष्णु क्षीरसागरात दडला. त्रिपुराने चंड व प्रचंड असे दोन मानसपुत्र उत्पन्न केले आणि एकाला ब्रह्मलोकाचे व दुसऱ्याला विष्णूलोकाचे राज्य दिले.
नंतर कैलासापाशी जाऊन त्याने आपल्या बाहुने तो सर्व पर्वत । हलवला. त्याचा हा पराक्रम पाहून शिवशंकर आनंदित झाले. त्यांनी त्रिपुरास वर मागावयाला सांगितले. तेव्हा त्याने शंकरापाशी कैलास पर्वत मागितला. त्यानंतर शंकराने आपले कैलासावरील पवित्र असे स्थान त्या दैत्याला दिले आणि आपण मंदार पर्वतावर निघून गेले.
पृथ्वीवर आलेल्या त्रिपुराच्या भीमकाय नामक सेनापतीने पृथ्वीवरील सर्व राजांपासून खंडणी घेतली. तेथे चाललेली देवकृत्ये बंद पाडली. त्रिपुराच्या पाताळात गेलेल्या वज्रदंष्ट्र सेनापतीने सर्व नागांचा पराभव केला. अशा प्रकारे त्रिपुरासूर त्रिभुवनाचे राज्य करू लागला.
आपल्या पराभवामुळे गिरीकंदरी लपून बसलेले इंद्रासह सर्व देव त्रिपुराच्या वधाविषयी विचार करत असता, नारदमुनी तेथे प्रगट झाले व म्हणाले, “त्रिपुराने हजरो वर्षे गजाननाची तपश्चर्या केली म्हणून त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तेव्हा तुम्ही सर्वजण गजाननाची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घ्या.” असे सांगून नारदमुनींनी सर्व देवांस एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. नंतर सर्व देव गणपतीची तपश्चर्या करू लागले.
त्यांची निस्सीम तपश्चर्या पाहून गजानन प्रगट झाले. तेव्हा देवांनी गजाननाची आठ श्लोकांनी (प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रम् विनायकम् अर्थात साष्टांग नमन हे गौरीपुत्रा विनायका) स्तुती केली. संकटाचे निवारण होण्यासाठी देवांनी ही स्तुती केली म्हणून त्या अष्टश्लोकी स्तोत्राला ” संकटनाशनम् गणपती स्त्रोतम ” असे नाव प्राप्त झले. जो कोणी दिवसातून तीन वेळा भक्तीयुक्त अंतःकरणाने त्या स्त्रोताचा पाठ करील, त्याला कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटाची पीडा होणार नाही, असा प्रत्यक्ष गणपतीने या स्त्रोत्रास वर दिला आहे.
देवांस आश्वासन दिल्यावर ब्राह्मणाचे रूप घेऊन गजानन त्रिपुराकडे गेला व म्हणाला, “राजा, मी एक ब्राह्मण असून चौसष्ट कलांचा अभ्यास केला आहे. म्हणून मला कलाधर असे म्हणतात. तुझी किर्ती ऐकून तुझ्या दर्शनास आलो आहे.” तेव्हा त्रिपुरासुर म्हणाला, हे कलाधरा, तू तुझी कला दाखव. तुझी कला पाहून मी प्रसन्न झालो तर मी तुला आपले प्राणसुद्धा देईन !
तेंव्हा कलाधर त्याला म्हणाला, “हे राजन , मी तुला तीन उत्तम प्रकारची वेगवेगळी विमाने करून देतो. त्या विमानातून तुला एका क्षणात हवे तिथे जाता येईल व जे काय मनात आणशील ते तुला मिळेल . तसेच एका शंकराशिवाय कोणालाही त्या विमानांचा भेद करता येणार नाही. ज्यावेळी, शंकर एका बाणाने त्या तीन विमानांचा भेद करेल तेव्हा तुझाही नाश होईल! नंतर कलाधराने उत्तम प्रकारची तीन विमाने तयार केली.
ती विमाने पाहून त्रिपुराला फार आनंद झाला व त्याने त्या कलाधरास काय पाहिजे ते मागावयास सांगितले. तेव्हा कलाधराने कैलास पर्वतावरील गजाननाची चिंतामणी नावाची मूर्ती त्रिपुरासुराकडे मागितली.कलाधराची मागणी त्रिपुरासुरास अत्यंत तुच्छ वाटली. त्याने आपला दूत शंकराकडे पाठवला आणि उन्मत्तपणे चिंतामणी मूर्तीची मागणी केली.
“चिंतामणीची मूर्ती तुझ्यासारख्या उन्मत्त पुरूषास जन्मजन्मांतरीही लाभणार नाही.” असा उलटा निरोप शंकराने त्रिपुरास पाठवताच त्रिपुरासुर क्रोधीत झाला. व त्याने तत्काळ चतुरंग सेना एकत्रित करून मंदार पर्वतावर स्वारी केली. शंकर आणि त्रिपुरासुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले. त्रिपुरासुराने शंकराच्या सर्व सैन्याचा फन्ना उडवला. आणि फक्त शिवशंकर युद्धभुमीवर उरले. एकट्याने युद्ध करून जय मिळणार नाही असे वाटून शिवशंकर युद्धभूमी सोडून गिरीकंदरात लपून बसले. शंकराचा पराभव झाल्याचे समजताच पार्वती मंदार पर्वत सोडून आपला पिता हिमालय याला शरण गेली .
विजय प्राप्त झाल्यावर त्रिपुरासुर मंदार पर्वतावर आला असता तेथे त्याला सहस्त्रसूर्याप्रमाणे तेजस्वी चिंतामणीची मूर्ती सापडली. ती घेऊन त्रिपुर मोठ्या आनंदाने परतत असताना त्याच्या हातातील मूर्ती एकाएकी नाहीशी झाली. मूर्ती नाहीशी झाली हा अपशकुन समजून
त्रिपुरासुर दुःखी झाला.
देवांच पराभव झाल्यामुळे त्रैलोक्यात अधर्म सुरू झाला व यज्ञयागादि | कर्मे बंद पडली. हा प्रकार पाहून शकर इतर देवांसह त्रिपुरासुराच्या नाशाचा उपाय योजू लागले. तेव्हा नादरमुनी प्रगट होऊन शंकरास म्हणाले, “महादेवा, युद्धास जातेवेळी तू प्रथम गजाननाचे पूजन केले नाहीस, म्हणून तुला जय मिळाला नाही. त्यासाठी आधी गणपतीची आराधना कर, त्याला प्रसन्न कर आणि मग युद्धास जा, म्हणजे तुला जय मिळेल.” शंकरास नारदमुनींचे म्हणणे पटले आणि दंडकारण्यात जाऊन शंकरानी गजाननाची षडाक्षर मंत्रांनी आराधना केली. त्यावेळी शंकराच्या मुखातून एक दिव्य पुरूष उत्पन्न झाला व शंकरास म्हणाला, “मीच गजानन आहे. मीच सृष्टीचे पालनपोषण करतो. मी तुजवर प्रसन्न झालो आहे. तुला जे जे वर पाहिजे असतील. ते ते मागून घे.”
गजाननाचे भाषण ऐकून शंकरास आनंद झाला व त्याने गजाननाची स्तुती केली. स्तुती ऐकून गजानन म्हणाले, “शंकरा, माझ्या बीजमंत्राचा जप करून एक बाण अभिमंत्रित कर. तो बाण तू त्या राक्षसाच्या पुरांवर सोडलास म्हणजे त्याची तिन्ही पुरे एकदम नष्ट होतील.. त्यांनंतर तू सहज त्याचे भस्म करशील.” असे बोलत गणपतीने शंकराला आपले सहस्त्रनाम सांगितले. त्या सहस्त्रनामाचा जप केला असता कोणत्याही कृत्यात जय होतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.
गजानानाकडून वर मिळाल्यावर शंकरास आनंद झाला आणि त्यांनी ज्या ठिकाणी गजाननाची आराधना केली, त्याठिकाणी गजाननाचे एक देवालय बांधले. तेथे शहर बसवून त्याला “मणिपूर ” असे नाव दिले. मणिपूर म्हणजेच आजचे रांजणगाव.
गजाननाच्या वरप्राप्तीनंतर शंकराने सर्व देवांस युद्धांस बोलावले त्रिपुरासुराचे व शंकराचे तुंबळ युद्ध सुरू झाले. त्रिपुरासुराच्या नाशासाठी शंकरांनी पृथ्वीचा रथ केला, चंद्र-सूर्याची चाके लावली. ब्रह्मदेवाला सारथी, विष्णूचा बाण आणि अश्विनीकुमारांना घोडे केले. अशी तयारी झाल्यावर शंकराने गणेशसहस्त्रनामाचा पाठ केला. त्यानंतर एकाक्षर आणि षडाक्षर मंत्रांच्या जपाने धनुष्य तसेच बाण दोन्ही अभिमंत्रित केले गेले .
नंतर धनुष्यास बाण लावून तो कर्णापर्यंत ओढून सोडला. तेव्हा त्रिभुवनात एकदम विजेसारखा लख्ख प्रकाश पडला व त्रिपुराला मूर्च्छा येऊन तो खाली पडला आणि असुराच्या तिन्ही पुरांचे भस्म झाले. त्रिपुराच्या शरीरातून एक ज्योती निर्माण होऊन तिने शंकराच्या शरीरात प्रवेश केला व त्रिपुर मुक्त झाला अशी आकाशवाणी झाली. त्या दिवसापासून शंकराला त्रिपुरारी हे नाव प्राप्त झाले. ह घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात.
गणेश सहस्त्रनाम महात्म्य :
सहस्त्रनामाचे पठण केलयाने सर्व फल प्राप्ती होते . दरिद्री माणसाने सतत चार महिने या स्त्रोताचे पठण केले आणि गणपतीच पूजन केले तर त्याचे सात जन्माचे दारिद्र्य नष्ट होऊन त्याला अनंतलक्ष्मी । • प्राप्त होईल अशी प्रत्यक्ष गजाननाची वाणी आहे. तसेच, “मला आनंद
देणाऱ्या एकवीस नावाचे जो मनाने पठण करील, त्याला सहस्त्रनाम जपल्याचे पुण्य लाभेल. असाही एक उपाय प्रत्यक्ष गजाननांनी सांगितला आहे. १) गणंजय २)गणपती ३) हेरंब ४)धरणीधर ५) महागणपती ६)यक्ष ७) ब्रह्मणस्पती ८) क्षिप्रसाधन (ज्याला लवकर प्रसन्न करून घेता येतो असा) ९) अमोघसिद्धी १०) अमित ११) मंत्र १२) चिंतामणी १३) विधी १४) सुमंगल १५) बीज १६) आशापूरक १७) वरद १८) शिव १९) कश्यपनंद २०) वाचासिद्ध २१) ढौंढी विनायक.
(Ranjangav Shri Mahaganapati रांजणगावचा श्री महागणपती ) महागणपतीचे मंदिर व मूर्ती :
मंदिर मुख्य रस्त्यापासून जवळच आहे आणि पूर्वाभिमुख आहे मंदिराचे प्रवेशद्वार भव्य व प्रेक्षणिय आहे. प्रवेशद्वारावर जयविजय नावाचे भव्य द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या इमारतीवर पेशवेकालीन नगारखाना आहे, ज्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशींनी अक्षय तृतीया ९ मे १९९७ रोजी केले.
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पेशवेकालीन धाटणीचे मुख्य देवालय दिसते. मंदिर बांधताना दिशासाधन केले आहे. त्यामुळे दक्षिणायनात (संक्रांतीनंतर) गणेशाच्या मूर्तीवर सूर्याचे किरण पडतात. हे येथील वैशिष्ट्य आहे. रांजणगाव देवस्थान श्रीमंत माधवराव पेशवेंच्या लढाईवर येण्या-जाण्याच्या मार्गावर असल्याने ते इथे थांबून आवर्जुन देवदर्शन घ्यायचे. त्यांनीच या स्वयंभू मूर्तीभोवती दगडी गाभारा बांधून सन १७९० साली अन्याबा देव यांना वंशपरंपरागत देवाची पूजा करण्याची वहिवाट सनद दिली.
अन्याबा देव यांना मोरया गोसावींनी पंचारशी धातूंची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. त्या मूर्तीची उत्सवात मिरवणूक निघते.
मंदिरातील मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आणि आसन मांडी घातलेली आहे. मूर्तीचे कपाळ रूंद आहे. दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी उभ्या आहेत. असं म्हणतात की येथील खरी मूर्ती तळघरात दडवलेली आहे. तिला दहा सोंडे वीस हात आहेत. या गणेशाचे नाव महोत्कट आहे. या गोष्टीचा देवालयाच्या विश्वस्तांनी साफ इन्कार केला आहे.
रांजणगाव महागणपती मंदिराच्या आवारात जुन्या देवळाचे दगडी खांब दिसतात. त्यावरून मूळचे मंदिर नवव्या-दहाव्या शतकातील हेमाडपंती वास्तूशैलीचे असावे असा इतिहास संशोधकांचा अंदाज आहे.
( Ranjangav Shri Mahaganapati रांजणगावचा श्री महागणपती ) रांजणगावातील इतर धार्मिक स्थळे :-
१) मंदिराच्या जवळच सुमारे १६ कि.मी. अंतरावर म्हणजे शिरूर सोडल्यावर पुणे – नगर रोडवर ५ कि.मी. वर उजव्या बाजूला देवदैठण येथे श्री संत लिंबराज महाराज यांची समाधी आहे. २) संत शिरोमणी निळोबारायांचे समाधी स्थान श्री क्षेत्र पिंपळनेर शिरूरपासून २० कि.मी. च्या अंतरावर आहे.
३) निजामाच्या काळात नामदेवबुवा तेली मांजरेकर या व्यापाऱ्यावर गणेशकृपा झाली होती त्या नामदेवबुवांची समाधी देवळापासून जवळच उजव्या हाताला आहे.
उत्सव :-
रांजणगावातील गावकऱ्यांकडे गणपती येत नाही. तर भाद्रपद महिन्यात ते सगळे गणेशपुजनासाठी मंदिरातच येत असतात. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत रांजणगावात मोठा उत्सव असतो. पहिले चार दिवस गावातील वेगवेगळ्या आळ्यांमध्ये गणपतीची पालखी जाते. याला द्वारयात्रा म्हणतात. उत्सवाच्या चार दिवसात ग्रामस्थांना गाभाऱ्यात शिरून प्रत्यक्ष महागणपतीची पूजा करता येते. पंचमीला भक्तमंडळींना महाप्रसाद दिला जातो. तर दुपारी तीन नंतर कुस्त्यांचा आखाडा असतो. षष्ठीला गावातील मारूतीच्या देवळापासून महागणपतीच्या मंदिरापर्यंत लोटांगण घालण्याची प्रथा रांजणगावात आहे.
( Ranjangav Shri Mahaganapati रांजणगावचा श्री महागणपती )अन्य उपयुक्त माहिती :-
१) देवस्थान ट्रस्टने भक्तांच्या सोयीसाठी भव्य अतिथी निवास बांधले आहे. २) पहाटे ५.३० ते रात्रौ १०.०० पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. देवस्थानतर्फे महाप्रसाद दिला जातो.
॥ श्री त्रिपुरारिवरदो महागणपतिर्विजयते ॥
https://www.youtube.com/channel/UCVsS4U85WAltN8hT5ipQVDg
Ranjangav Shri Mahaganapatiश्री महागणपती रांजणगाव
Ashtvinayak ganapti theur | थेउर च्या चिंतामणी ची संपूर्ण माहिती इतिहास व 2 पौराणिक कथा
Moreshwar Ashtvinayak मोरगावचा श्री मोरेश्वर का म्हणतात 1 ला अष्टविनायक गणपती व त्यामागच्या 2 कथा
Coconut Birth Story: नारळाचा जन्म कसा झाला? 1 रोचक कथा